दापोडी उड्डाणपुलास तुकाराम महाराजांचे नाव द्या 

0
पिंपरी चिंचवड : दापोडी येथील उड्डाणपुलाचे ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज’ असे नामकरण करण्यात यावे, याकरीता पिंपरी चिंचवड शहर समाजवादी पक्षाच्या शिष्टमंडळाने महापौर राहुल जाधव यांची भेट घेत त्यांना मागणीचे निवेदन दिले आहे.
‘ जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पावन स्पर्शाने पिंपरी चिंचवडची भूमी कृत-कृत झाली आहे. संत तुकाराम महाराजांनी सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक संदेश देत समाज परिवर्तनाचे महान काम केले आहे. त्यांचे विचार व त्यांच्या कार्याची दखल घेत महापालिकेने दापोडी उड्डाणपुलाला ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज’ यांचे नाव द्यावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रफीक कुरेशी यांनी म्हटले आहे. शिष्टमंडळात पिंपरी चिंचवड शहर महासचिव मोहसीन शाह, शहर उपाध्यक्ष सालीम भाई सय्यद, संघटक विनोद कुमार यादव, सुरेश शर्मा, गफ्फुर खान, आरीफ खान व कार्यकर्ते उपस्थित होते.