दापोडी दुर्घटनेतील नागेश जमादार यांच्या कुटुंबियांना मदत द्या; अन्यथा धरणे आंदोलन करणार ः सुलभा उबाळे

0

पिंपरी :- दापोडी दुर्घटनेतील नागेश जमादार यांच्या कुटुंबियांना मदत न मिळाल्यास 16 जानेवारी रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे. शिवसेना पिंपरी चिंचवड शहरच्यावतीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले.
दापोडी दुर्घटनेला 1 महिना उलटून हि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे कोणतेही मदत दुर्घटनेतील मृत मजूर नागेश जमादार यांच्या कुटुंबियांना करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या कुतुबियांवर आर्थिक संकट ओढलेले आहे. नागेश यांच्या पश्‍चात आई-वडील व चार बहिणी असा मोठा परिवार आहे. सध्या त्यांच्यावर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न देखील निर्माण झालेला आहे. नागेशवरच त्यांचे सर्व कुटुंब अवलंबून होते. यापुर्वी संबधित अधिकारी त्यांच्याशी बोलेले असता त्यांनी मदत करण्याची ग्वाही दिली होती , मात्र ती त्यांनी पाळली नाही. म्हणून गुरुवार दि.16 जानेवारी रोजी शिवसेने कडून नागेश जमादार त्यांच्या कुटुंबीया समवेत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा महापालिकेला देण्यात आला आहे. यावेळी शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, युवसेना विभाग संघटक निलेश हाके, मनोज बोरगे, विकास गायकवाड उपस्थित होते.