दापोडी-निगडी बीआरटी मार्गातील दहा थांबे ‘पीएमपी’कडे हस्तांतरीत

0

पिंपरी-चिंचवड : दापोडी-निगडी या ग्रेडसेपरेटर मार्गावरील सेवा रस्त्यावरचे बीआरटीएसचे 10 तयार बसथांबे महापालिका पीएमपीकडे हस्तांतरीत करणार आहे, असे महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. तसेच, बीआरटी सेवा नोव्हेंबर महिन्यांच्या अखेरीस सुरू करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. या 36 बस थांबे आहेत. त्यातील 22 थांबे महापालिका व 14 बीव्हीजी कंपनी बांधत आहे. मार्ग लवकरात लवकर सुरू करण्याबाबत नियोजन आहे. त्या दृष्टीने काम केले जात आहे. दापोडी, फुगेवाडी, फुगेवाडी जुना जकातनाका, खराळवाडी, निगडी, चिंचवड स्टेशन, बजाज ऑटोयेथील दहा थांबे तयार झाले आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.

नाशिक फाटा चौकात स्टेशन
आयुक्त म्हणाले, पहिल्या टप्प्यात कासारवाडी येथील नाशिक फाटा चौकात हे स्टेशन उभारले जाणार आहे. या चौकात दुभाजक टाकून सिग्नल काढून टाकले जाणार आहेत. या चौक परिसरातील अतिक्रमणावर पोलिसांचा बंदोबस्त मिळताच कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः कार डेकोरेटर्स व वर्कशॉप व्यावसायिकांने रस्त्यांवर केलेले अतिक्रमण प्राधान्याने हटविले जाईल. पादचार्यांसाठी पदपथ खुले करून दिले जातील. जेथे पदपथ नाहीत, तेथे नव्याने तयार केली जातील. सायकल वापरास चालना देण्यासाठी सायकल ट्रॅक विकसित केले जाणार आहे. बीआरटी, मेट्रो, बस आणि रेल्वे असा सर्व प्रवाशांना आणि पादचार्यांना सोईस्कर ठरतील अशी ‘मल्टी मॉडेल ट्रान्स्पोर्ट हब’ शहरातील प्रत्येक रेल्वे स्थानकाजवळ तयार केली जाणार आहेत. त्यात दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी या स्थानकाचा समावेश आहे.