दापोरा येथील महिलेला सर्पदंश

0

जळगाव । जळगाव तालुक्यातील दापोरा येथील 20 वर्षीय महिलेला सकाळी 6 वाजेच्या सुमारास सापाने चावा घेत जखमी केले. तिला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार सोनी समाधान मोरे(वय 20, रा.दापोरा, जळगाव) ही सकाळी प्रात:विधीकरुन घरी परतत असतांना 6 वाजेच्या सुमारास पायाला सापाने चावा घेतला. त्या घरी आल्यावर त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने घरच्यांनी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले.