जळगाव। तालुक्यातील दापोरा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून मंगळवारी 6 रोजी धडक कारवाई करण्यात आली. यात 15 हजार किमतीच्या गावठी दारु रसायन नष्ट करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्काने सलग दोन दिवस धडक कारवाई केली.
सोमवारी गावठी दारूचे 14 हजार 450 रुपयांचे रसायन नष्ट केले होते. दारोपा येथील हातभट्टीची दारू बंद करण्यात यावी अशी मागणी महिला वर्गाकडून होत होती. त्यानुसार याच आठवड्यात पथकाकडून दुसरी करण्यात आली. या कारवाईत 600 लिटर दारु निर्मितीचे रसायन नष्ट करण्यात येऊन 14 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.