दाभोळकर हत्याप्रकरणी आरोपी सचिन अंदुरेला न्यायालयाच्या आवारात बांधली राखी

0

पुणे-अनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी असलेला सचिन अंदुरे कोठडीत आहे. आज शिवाजीनगर न्यायालयात सुनावणी असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. राखीपौर्णिमा असल्याने त्याच्या बहिणीने आपल्या भावाला राखी पाठवली होती. ही राखी बहिणीने वकिलांकरवी पाठवली होती. अंदुरे याला त्याच्या मेहुणीकडून न्यायालयात ही राखी बांधण्यात आली.

राखीपौर्णिमेच्या दिवशी असलेल्या सुनावणीदरम्यान आरोपीला अशाप्रकारे बहिणीने पाठवलेली राखी बांधल्याने काहीसे भावूक वातावरण झाल्याचे पहायला मिळाले. डॉ. दाभोळकर यांची ५ वर्षापूर्वी हत्या झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २१ ऑगस्ट रोजी राखीपौर्णिमा होती. सचिन अंदुरेला आज पुढील सुनावणीसाठी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला ३० ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.