दाभोळकर हत्याप्रकरणी एसआयटी पुढील आठवड्यात आरोपपत्र दाखल करणार

0

मुंबई-डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पुढील आठवड्यात आरोपपत्र दाखल करु, अशी माहिती एसआयटीने मुंबई हायकोर्टात दिली. फरार आरोपींचा शोध मात्र अद्यापही सुरू असल्याचे कोर्टात सांगण्यात आले.

दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर गोविंद पानसरे यांची देखील हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी दोन्ही कुटुंबीयांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर आज बुधवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली.