दाभोळकर हत्येच्या तपासासाठी अंनिसतर्फे ‘जबाब दो’ आंदोलन

0

भुसावळ। समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यात आपले आयुष्यपणाला लावलेले महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची भावना असतांना अद्यापही आरोपींना अटक करण्यात आली नसल्यामुळे अंनिसतर्फे शुक्रवार, 18 रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर ‘जबाब दो’ आंदोलन करण्यात आले. तसेच आपल्या विविध मागण्यांसदर्भात प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन देण्यात आले.

आरोपींच्या हयातीबद्दल व्यक्त केली शंका
अंनिसतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, सीबीआयने जाहिर केलेल्या पोस्टर्सवरील आरोपींनाही जिवंत ठेवले की नाही याबाबतही शाशंकता निर्माण झाली आहे. या प्रकाराचीही चौकशी विशेष अधिकार्‍यांमार्फत करण्यात यावी. गेल्या काही दिवसांपासून अल्पसंख्याक समाजावर वेगवेगळ्या कारणामुळे हल्ले होत आहेत.

कारवाई करावी याबाबत कोणतीही कारवाई होत
नसल्यामुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. साहरनपुर, शब्बीरपुर येथे दलितांवरील हल्ले कलंकित करणारे आहेत. याबाबतही सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही. तद्वताच गुजरात मध्येही अशाच घटना घडत आहेत. यासर्व प्रकारामुळे देशात अशा प्रवृत्तींची हिंमत वाढलेली असल्याने समाजात या प्रवृत्तींमुळे दहशतीचे वातावरण असल्याचे नमूद केले आहे.

यांची होती उपस्थिती
या आंदोलनात सागर बहिरुणे, के.एम. वाघ, शामकुमार वासनिक, अरुण दामोदर, अंजना निरभवणे, भगवान निरभवणे, शांताराम जाधव, रवींद्र अहिरे, दीपक सोनवणे, सिध्दार्थ सोनवणे, शशीकांत रायमळे, आनंद मित्र, पंडीत सोनवणे, गणेश दोडे, नंदा तायडे, कुंज बिहारी, विजय सोनवणे यांची उपस्थिती होती.