जळगाव। मिरारोड पोलिस ठाण्यात 10 जुन रोजी पंच्चावन्न वर्षीय फरिदा खान (नाव बदललेले) यांनी तक्रार दिली. त्यात नमुद केल्या प्रमाणे दोन महिन्यापुर्वी त्या, खामगाव (जि.बुलढाणा) येथे गेले होते. तेथे यतिम खान्यात नुरमोहम्मद मौलाना याच्याशी ओळख होवुन त्यांनी, तूम्ही अडचणीत दिसता असे सांगत..तूमच्याकडची रक्कम दामदुप्पट करुन मिळेल, दैव दृष्टीतून प्रार्थनाकरुन पैशांचा पाऊस पाडू शकतो, एखाद्या श्रीमंताच्या घरातील करोडोची रक्कम इकडून तिकडे हलवण्याची शक्ती आमच्या विद्येत असल्याच्या भुलथापा देत..तेथेच चत्मकाराचे प्रात्याक्षिकही दाखवले. त्यावर शिक्षणाचा आणि आपण उच्चभ्रु असचल्याची चुणूक दाखवावी म्हणुन फरीदा यांनी..ऍग्रीमेंटचा विषय केला त्यावरही ते मान्य होवुन तुम्ही कॅश दाखवा लगेच ऍग्रीमेंट होईल असी हमी दिली होती. ठरल्यानुसार मौलाना स्वत: मुंबईला न येता..पाऊस पाडण्यासाठी लागणारी आवश्यक सामुग्री घेण्यासाठी हवे असलेले पैसे घेण्यासाठी भडगाव येथील रज्जाक वजीर तडवी(वय-41) व गोपी मल्लू गौंड(वय-60) या दोघांना पाठवले. 10 जुन रोजी दोघांनी फरीदा यांच्याकडे जावुन मस्त मेजवानी खाल्ल्यावर रुखसार या एअर होस्टेसच्या आईने तिच्या खात्यातून रक्कम काढून आणलेली सात लाख दोघांना दिले. दोघांनी कब्रस्थानाच्या वीधीचे नाव करीत पोबारा केला होता.
अशी पटली ओळख
भडगावाचा वजीर तडवी व गोपी गौंड या जोडीने फरीदा हुसैन यांना आम्ही आज रात्री कब्रस्थानात जात आहोत..तेथे सोबत आणलेल्या सामुग्रीने वीधी झाल्यावर तूम्हाला..तुमचे पैसे मिळतील…मात्र हुसैन यांनी येणारे 100 कोटी कसे व कुठे ठेवावे हा प्रश्न पडला होता..त्यांनी कब्रस्थानात सोबत येण्याचे सांगीतल्यावर दोघा भामट्यांनी…तेथे महिलांना येण्यास मज्जाव असतो, तुमच्या जीवाचे बरेवाईटही होवु शकते असा धाक दाखवला. अखेर दोघांनी सात लाखांची रोकड घेवुन पोबारा केला. मात्र अपार्टमेंट मध्ये व घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीत दोघांचे चेहरे स्पष्ट आल्याने त्यांचे फोटो पोलिस ग्रृपवर व्हायरल होवुन जळगाव एलसीबीच्या रविंद्र पाटील, शशिकांत पाटील, विनोद पाटील यांनी दोघे भडगावचे असल्याचे आळखले. निरीक्षक राजेशसींह चंदेल यांच्यासह पथकाने सापळा रचुन पावणे दोन लाखांच्या रकमेसह दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान दोघांचे कसून चौकशी एलसीबीकडून करण्यात येत आहे. तर त्यांच्याकडून अनेक फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निवडणुकीचे कर्ज फेडले
भडगावच्या घोडबल्डी यशवंत नगरात राहाणारा रज्जाक वजीर तडवी हा दोन वर्षापुर्वी निवडणुकीत उभा होता. तेव्हा त्याने वीस लाख रुपये खर्च केला होता. त्यात त्याला कर्ज देणारी मंडळी पैशांसाठी तगादा लावत असल्याने तो परेशान होता. मात्र अशातच त्याला बुलढाण्यातील नुरमोहम्मद मौलानाने आपल्या सोबत काम करण्याची ऑफर दिली. मुंबईच्या कामातुन आलेल्या सात लाखातून तीन लाख मौलाना घेवुन गेला. उर्वरीत रकमेत रज्जाकने उधारी दिली. पावणे दोन लाख शिल्लक असतांनाच गुन्हेशाखेने त्यांच्यावर झडप घातली.आज सकाळी मुंबई पेलिसांनी त्याला अटक करुन खामगाव येथे मौलवीच्या शोधात मोहीम राबवली.