धुळे । जिल्हा क्षयरोग विभागातील महिला कर्मचारी यांचे आर्थिक व मानसिक छळ करणार्या प्रविण सानप याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन दामिनी महिला अन्याय अत्याचार निवारण संघटनेच्या पदाधिकारी केले.
याप्रकरणी प्रविण सानप, मिलींद धात्रक,डॉ.अनिल भामरे यांची चौकशी करण्याची मागणी निवासी जिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या पुतळा दहन आंदोलनात अॅड चंद्रकात येशीराव, तेस पाटील,अजय पाटील,अमोल चौधरी,अनिल बागुल आदि सहभागी झाले होते.