जळगाव : शहरातील गांधीनगर परिसरात कुलूपबंद घर फोडून चोरटयांनी सुमारे 07 लाख 66 हजार रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिणे तसेच रोकड लांबविल्याची घटना 27 सप्टेंबर 19 रोजी घडली होती. या प्रकरणी दाखल गुन्हयात तपासचक्रे फिरवून पोलिसांनी संशयीतांकडून जप्त केलेला मुददेमाल मंगळवारी डॉ. नेहते दाम्पत्याच्या स्वाधीन केले. चोरटयांनी रोकड सोन्या चांदीचे दागिणे ,भांडे असा ऐवज लुटून नेला होता. पोलिसांनी मेहनत घेऊन तपास केला. त्यामुळे चोरीस गेलेला मुददेमाल मिळू शकला. चोरीचा ऐवज पोलिसांच्या मदतीने पुन्हा मिळाला, याचा आज खूप आनंद होतोय. पोलिसांचेही खूप खूप आभार अशा शब्दात नेहते दाम्पत्याने भावना व्यक्त केली
अपर पोलीस अधीकांच्या हस्ते सुपूर्द केला मुद्देमाल
डॉ.बाळकृष्ण नेहते तसेच त्यांच्या पत्नी गिता नेहते हे दाम्पत्य 180 गांधीनगर जळगाव येथे वास्तव्यास आहेत. सप्टेंबर महिन्यात दाम्पत्य घराला कुलूप लावून नाशिक येथे गेले होते. 27 सप्टेंबर रोजी त्यांचे कुलूपबंद घर अज्ञात चोरटयांनी फोडून आत प्रवेश केला. कपाटातील सामान अस्तव्यस्त करत सुमारे 07 लाख 66 हजार रूपयांचा ऐवज अज्ञात चोरटयांनी लंपास केला. या प्रकरणी फिर्याद दिल्यावरून जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हापेठ पोलिसांनी गुन्हयाच्या तपासात मोनूसिंग बावरी याच्यासह एका अल्पवयीन मुलास अटक केली. संशयीतांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी सदरचे दागिणे शहरातील विनोद जैन या सोन्या चांदीच्या व्यावसायीकाला विकल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी विनोद जैन याला अटक करून मुददेमाल हस्तगत केला. अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या हस्ते मंगळवारी डॉ. बाळकृष्ण तसेच डॉ. गिता नेहते या दाम्पत्याला मुद्देमाल सुपुर्द करण्यात आला.
या पथकाची महत्वपूर्ण कामगिरी
पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके , सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन तसेच एलसीबीचे निरीक्षक बापू रोहोम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांच्या पथकातील हेड कॉन्सटेबल तुषार जावरे, भटू नेरकर पोलीस नाईक शेखर जोशी, पोलीस नाईक फिरोज तडवी, पोलीस नाईक अजित पाटील, पोलीस कॉन्सटेबल संजय जाधव, पोलीस कॉन्सटेबल छगन तायडे, पोलीस कॉन्सटेबल अविनाश देवरे, पोलीस कॉन्सटेबल हेमंत तायडे ,प्रशांत जाधव यांच्या पथकाने तपासात महत्वपूर्ण कामगिरी बजावली.