A couple in Jondhankheda was beaten and robbed in the forest: six accused arrested मुक्ताईनगर : तालुक्यातील जोंधनखेडा येथील दाम्पत्य जंगलात लघू शंकेसाठी थांबताच सहा ते सात संशयीतांनी मारहाण करीत महिलेचा विनयभंग केला तसेच महिलेच्या अंगावरील दागिण्यांसह 37 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सहा जणांना अटक केली.
दाम्पत्य थांबताच संशयीताचा हल्ला
पंकज रामसिंग राठोड (21, रा.जोंधनखेडा, ता.मुक्ताईनगर) हा तरूण आपल्या पत्नी सपना सह वास्तव्याला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील माळेगाव शिवारातील कालिका माता मंदीरापासून काही अंतरावर दाम्पत्य बुधवार, 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास रस्त्याने जात असताना लघू शंकेसाठी थांबल्यानंतर संशयीत बहादूर, तोरे आणि प्रतापसह त्याचे अन्य सात साथीदार काही क्षणात आले व त्यांनी पती-पत्नीला जंगलात नेवून बेदम मारहाण केली. विवाहिता सपनाच्या अंगावरील दागिने व बाराशे रुपयांची रोकड असा एकूण 37 हजार 200 रुपयांचा मुद्देमाला जबरीने लांबवला. ही दाम्पत्याने मुक्ताईनगर पोलिसात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली. तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर करीत आहेत.