दाम्पत्याला लुटले

0

शिक्रापूर । कासारी फाटा येथे एका दाम्पत्यास मारहाण करून लुटल्याची घटना समोर आली आहे. याबाबत सोमनाथ तांबे (रा. हिवरे कुंभार) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तांबे सोमवारी (दि. 11) रात्री 11 च्या सुमारास दुचाकीवरून पत्नीला माहेरी सोडण्यासाठी चालले होते.

त्यावेळी कासारी फाटा येथे पाठीमागून तीन व्यक्ती त्यांच्या दुचाकीची लाईट बंद करून आल्या. त्यातील एकाने तांबे यांच्या मानेवर थाप मारून दुचाकी आडवी लावून तांबे यांना अडवले. तांबे दाम्पत्यास मारहाण करीत त्यांच्या पत्नीचे मंगळसूत्र, हातातील चांदीच्या बांगड्या, पर्स, तसेच मोबाईल असा 36 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रशांत माने करीत आहेत.