अमळनेर – दाम दुप्पट, किंवा प्रलोभन देऊन सहज सर्वसामान्य लोकांची फसवणूक होत आहे. मात्र याला अपवाद एलआयसीच्याच पारदर्शक कारभारामुळे आजही लोकांचा आर्थिक व्यवहार सुरक्षित असल्याचे प्रांताधिकारी संजय गायकवाड यांनी भारतीय जीवन विमा निगमचा 62 वा वर्धापन दिनानिमित्त झालेल्या सप्ताहाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रा.अशोक पवार, शाखाधिकारी महेंद्र ठाकुर, उपशाखाधिकारी रमेश वानखेडे, विकास अधिकारी तुषार झेंडे,संजय शेटे, आर.बी.पाटील, मिलिंद मिसर, दीपक निकुंभ, नितिन पाटील, पंकज पाटील, अजय रोडगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी इन्शुरन्स लिंकचे उदघाटन प्रांतधिकारी संजय गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आले. या सप्ताहादरम्यान अमळनेर पोलीस उपविभागीय अधिकारी रफीक शेख यांनीही भेट देऊन विकास अधिकारी तुषार झेंडे यांच्या कामाचे कौतुक करून सर्व विकास अधिकाऱ्यांना शुभेच्या दिल्या