खेड-शिवापूर । शिवापूर येथे बेकायदा हातभट्टीची दारू विक्री केल्याप्रकरणी शिवापूर पोलिसांनी अंजना अरुण रजपूत (रा. शिवापूर) हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिवापूर येथे बेकायदा हातभट्टीवरील दारुची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिस हवालदार संतोष तोडकर आणि अजय शिंदे यांनी तेथे छापा टाकला. त्यावेळी अंजना हातभट्टीवरील दारू विक्री करताना आढळली. पोलिसांची चाहुल लागताच ती पळून गेली. पोलिसांनी हातभट्टीची तयार दारू आणि इतर साधने असा एकूण 320 रुपयांचा माल जप्त केला असून बेकायदा दारू विक्री केल्याप्रकरणी अंजना रजपूत हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.