दारुची चोरटी वाहतूक करणार्‍यांवर कारवाई

0

धुळे । शहरातील साक्री रोडवर असलेल्या महाविद्यालयासमोरील रस्त्यावर बेकायदेशीरपणे दारुची चोरटी वाहतूक करणार्‍या दोन जणांवर कारवाई करत दिड लाखाच्या मुद्देमालासह देशी-विदेशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. शहरातील श्रीराम नगर येथे राहणार्‍या दोघांवर धुळे शहर पोलिस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

दोन्ही आरोपींकडून तब्बल 720 सिलबंद बाटल्या जप्त
शहरातील साक्री रोड परिसरात देशी-विदेशी दारुची मोठ्या प्रमाणावर चोरटी वाहतूक केली जात असल्याची तक्रार अनेक दिवसांपासून केली होती. त्यानुसार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शहर पोलिस ठाण्यातील पो.नि.अनिल वडनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनि नाना आखाडे, हिरालाल बैरागी, नारायण कळसकर, पोहेकॉ मिलींद सोनवणे, जगदीश खैरनार, श्रीकांत पाटील, मुक्तार मन्सुरी, दिलीप परदेशी, पंकज खैरमोडे आदीच्या पथकाने विद्यावर्धिनी महाविद्यालयासमोर सापळा रचून एमएच 01-डीए 7742 क्रमांकाची गाडीची तपासणी केली असता त्यात मास्टर ब्रॅन्डच्या 192 बाटल्या तर आयबीच्या 48 तर टॅन्गोच्या 480 सिलबंद बाटल्या असे एकूण 1 लाख 55 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त करुन आरोपी गौरव नारायण सुर्यवंशी(23), दत्तात्रय आनंदा पवार(24) दोन्ही रा.श्रीराम नगर, विटभट्टी देवपूर. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.