शहादा । तालुक्यातील डामरखेडा गावी दारुबंदी करावी म्हणून ग्रामपंचायतीत ठराव करण्यात आला तर शहादा येथे पोलीस उपविभागीय अधिकारी महारु पाटील यांना महिलांनी दारु बंदीच्या ठरावाची नक्कल देत चर्चा केली. डीवायएसपी पाटील यांनी महिलांना दारूबंदीसाठी गावातील महिला पुरुषांच्या मदतीने आवाहन करत दारूबंदी होणार असे आश्वासन दिले. दारुमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. दारुसाठी काही भुरटे चोर बनलेत तर दारुड्यामुळे वस्तीत अशांतता राहते. काही युवक दारुमुळे दगावले.
ग्रामसभेत दारूबंदीच्या ठराव
संपूर्ण दारुबंदी झाली पाहिजे अशा कैफियत डामरखेडा येथील रेखाबाई पाडवी, गोतनबाई ठाकरे, कोकिळाबाई ठाकरे, जशीबाई मोरे, पदमाबाई पवार, लिलाबाई ठाकरे, मंगलाबाई मोरे, सुमन शेमळे आदि निवेदनकर्त्या महिलांनी पोलीस उपविभागीय अधिकारी महारु पाटील यांचे कडे मांडली. 1 मे 2017 रोजी डामरखेडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत दारूबंदीच्या ठराव माजी उपसरपंच रवींद्र ठाकरे यांनी सुचविलेल्या व ग्रामपंचायत सदस्य आशाबाई वंदे यांनी अनुमोदन दिलेला ठराव ग्रामसभेत पारीत केला होता. या ठरावाची नक्कल महारु पाटील यांना दिले. यावेळी डी. वाय. एस. पी. पाटील यांनी दारु बंदी होणार गावकर्यानी शांतता ठेवावी. कायदा हातात घेउ नये असे आवाहन महिलांशी चर्चा करताना केले.