दारु दुकानांचे काऊंटडाऊन सुरु

0

रावेर । महामार्गावरुन ये-जा करणार्‍या प्रवाशांची सोय व्हावी म्हणून रस्त्याशेजारी हॉटेल थाटणे, पण त्याबरोबरच आता ठिकठिकाणी परमीट रुम, बिअर बार, दारु विक्री करणारी तसेच आता बिअर शॉपीचा सुळसुळाटही वाढला आहे. यामुळे दारु पिऊन जाणार्‍यांची वाहने थेट महामार्गावर येतात. त्यांच्यामुळे होणार्‍या अपघातात अनेक निरपराधांचे प्राण जात असल्याने अशा महामार्गालगत मद्य विक्रीची परवानगी देऊ नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्या सूचनांची अंमलबजावणी तसेच धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी अशा दुकानांची पाहणी करण्यात आली. तालुक्यातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर सुमारे पाचशे मिटरच्या आत येणार्‍या परमिट बिअबार, वाईन शॉप, देशी दारु आदींचे कांउडाऊन सुरु झालेले आहे. सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गालगत असलेली दारुची दुकाने बंद करण्यासाठी फक्त एक महिना उरला आहे. त्यामुळे दारु विक्रेत्यांमध्ये धडकी भरली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आम्ही सर्वत्र मोजमाप करीत असून तसा अहवाल वरिष्ठांकडे सादर करणार आहे. त्यामुळे या अहवालानुसार न्यायालयाचा आदेश तसाच राहिल्यास सर्व दुकाने हलविण्याचे गरजेचे राहिल.
– दू.बी. इंगळे, दुय्यम निरीक्षक,
राज्य उत्पादन शुल्क

राष्ट्रीय महामार्गापासून पाचशे मिटरच्या अंतरावरावरील दुकानांवर येणार गदा
राष्ट्रीय महामार्गालगत दारु पिऊन गाडी चालविण्याचे प्रमाण जास्त झाले आहे. परिणामी अपघाताचे प्रमाणात वाढ होत आहे. याचा विचार करुन सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्गापासून सर्व दुकाने पाचशे मिटरच्या अंतरावर 31 मार्च पर्यंत हलविण्याचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. दरम्यान 1 मार्च रोजी राज्य उत्पादन शुल्क व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी रावेर, सावदा, खानापूर परिसरातील सर्व दारुच्या दुकानांची मोजमाप केले त्यात तालुक्यातील एकही शॉप न्यायालयाच्या आदेशानुसार वाचत नसल्याचे समजते. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर परमीट रुमचे मोठे जाळे असल्याने दारू पिऊन वाहन चालविण्याचे ’उद्योगा’मुळे अपघात वाढले आहेत. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांलगत परमीट रुमला बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती.

गुन्हे दाखल होणार
वाढते अपघात रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावरील संपुर्ण देशभरात महामार्गावरील दारुची दुकाने पाचशे मिटर पर्यंत आत हलविण्याचे आदेश दिले आहे. आदेशाला पारित करण्यासाठी आता फक्त एक महिना उलटला असून आता कारवाईला सुरुवात झालेली दिसत आहे. शहरातील सर्वचे सर्व दारुची दुकाने, परमिट बिअरबार राष्ट्रीय महामार्गात येत असून सर्वांवर संक्रांत येणार आहे हे नक्की. न्यायालयाचा आदेश न मानणार्‍या दुकान चालकांचे परवाने नुतनीकरण होणार नसून तरी सुध्दा दारु विकल्यास थेट गुन्हे दाखल होणार आहे.