दारु पिण्यास नकार दिल्याने चाकूहल्ला

0

भुसावळ । मित्रांसोबत गप्पा मारत असताना दारु पिण्यास नकार देणार्‍या युवकावर चाकूने वार करुन जखमी केल्याची घटना 21 रोजी रात्री 1.30 वाजेच्या सुमारास जळगाव रोडवर घडली.

याप्रकरणी पोलीसांनी एकास अटक केली़ शहरातील अयोध्या नगर भागातील रहिवासी केतन भरत चौधरी (वय 25) हा आपल्या मित्रासोबत 21 रोजी रात्री 1़.30 वाजेच्या सुमारास जळगाव रोडवर गप्पा मारत असताना बारक्या भोई (हंबर्डीकर चाळ, भुसावळ) तेथे आला़ काहीही कारण नसताना केतन यास दारु पिण्याचा आग्रह धरला. त्यावेळी केतनने नकार दिल्यानंतर त्याच्यावर चाकूने छाती, हातावर वार करण्यात आले. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आह़े यातील आरोपी बारक्या भोई याच्याविरुद्ध शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.