दारु विकणार नाही, पिणारही नाही!

0

शेंदुर्णी । येथील कोळी वाडा (वाल्मिक नगर) भागात कोळी समाज बांधव व महिलांची महत्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत दारूमुळे तरुण व्यसनाधीन होत असल्याने कुटुंब व भावी पिढी उध्वस्त होत आहे. तरुण मुलाच्या खांद्यावर बापाचे प्रेत जावे अशी अपेक्षा असते परंतु दारूचे व्यसन जडून मुलाचे आकस्मित निधन होऊन जन्म दात्यांना त्यांना खांदा द्यावा लागतो. दारूमुळे समाजाची प्रगती खुटत आहे. या गोष्टीचा विचार करता ‘दारू पिणार नाही, दारू विकणार नाही‘ असे संकल्प करण्याचे आवाहन पंडितराव जोहरे यांनी उपस्थित युवक व समाज बांधवांना केले. ह.भ.प. पंढरीनाथ गरूड यांनी युवकांना समाज भूषण आद्यऋषी रामायण रचनाकार महर्षी वाल्मिकी ऋषी यांचा आदर्श घेऊन संकल्प करण्याचे आवाहन केले. युवक, समाज बांधव व महिलांनी एकमुखाने संमती देत दारु विकणार नाही व पिणार नसल्याचे संकल्प केले.

आंदोलनाचा इशारा
या विषयाची अमलबजावणी करण्याकरिता समिती गठीत करण्यात आली. सदर उपक्रमाचे महिला वर्गाने स्वागत केले. काही महिलानी शौचालयचा प्रश्‍न उपस्थित केला. कोळी समाज स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता बनविण्याची मागणी व स्मशानभूमीत सुविधा पुरविण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली. याविषयी ग्रामपंचायतकडे पाठपुरावा करावा प्रसंगी मोर्चा आंदोलनचा इशाराही देण्यात आला.

महिलांची उपस्थिती
यावेळी किटकुल जोहरे, रमण कोळी, आसाराम कोळी, गणेश कोळी, शिवाजी कोळी, मांगो कोळी, संतोष कोळी, न्यानेश्‍वर कोळी, प्रवीण कोळी, राजू कोळी, अजय कोळी, अविनाश कोळी, अभिमान कोळी, संदीप कोळी, विजय कोळी, यशवंत कोळी, आनंद कोळी, गजानन कोळी, अमोल कोळी, जनाबाई कोळी, मनीषा कोळी, पार्वतबाई कोळी, नर्मदाबाई कोळी, शांताबाई कोळी, मीराबाई कोळी, मनीषा कोळी, सुमनबाई कोळी, ममता कोळी, रुपाली कोळी, प्रमिला कोळी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.