अमरावती : गावातील अवैध दारु विक्रीविरोधात संतप्त झालेल्या महिलांनी दारु विक्रेत्यांची गावातून अर्धनग्न अवस्थेत डोक्यावर चपला ठेऊन मिरवणूक काढली.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे ही घटना घडली. गावातील देशी दारुचे दुकान बंद करण्यासाठी महिलांनी सर्वानुमते दारू बंदीचा ठराव करुन दारुचे दुकान बंद केले. आता गावात कोणत्याच प्रकारची दारु गावात नको, अशी मागणी महिलांनी केली होती. ग्रामपंचायतीत याबाबतचा ठरावही मंजूर करण्यात आला होता. मात्र दारू विक्रीचा व्यवसाय सुरुच ठेवल्याने संतप्त महिलांनी विक्रेत्याची धिंड काढला.