बीड : दारूच्या आहारी गेलेले ऊसतोड कामगार दारू सोडविण्यासाठी जात असताना मांजरसुंबा-पाटोदा रोडवर ट्रक आणि बोलेरोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. बीडमधील पाटोदा रोडवर ही घटना घडली. मांजरसुंबा- पाटोदा रोडजवळ उभ्या असलेल्या ट्रकवर बोलेरो गाडी पाठीमागून येऊन आदळली. या ट्रकमध्ये जवळपास 11 मजूर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर आहे. या सर्व रुग्णांना सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ट्रकमध्ये असलेले सर्व कामगार हे ऊस तोड मजूर होते. हे सर्वजण कामगार दारुचे व्यसन सोडवण्यासाठी निवडुंगवाडीला जात होते. त्याचवेळी हा अपघात घडला. अपघातात मृत्यू झालेले सर्वजण हे एकाच गावातील रहिवाशी आहेत. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.