दारूची अवैध वाहतूक : दोघे आरोपी रावेर पोलिसांच्या जाळ्यात

0

रावेर- अवैधरीत्या दारूची रीक्षामधून वाहतूक करणार्‍या दोघांना रावेर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. आरोपींच्या ताब्यातून दारुच्या 64 विदेशी बाटल्यासह रीक्षा जप्त करण्यात आली. राहुल जनार्दन बाेंंडे (30) व कमलेश मोहनलाल गोगिया (30, दोघे रा.भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
रीक्षा (क्रमांक एम.एच.19 सी.एच.2716) मधून अवैधरीत्या दारुची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती रावेर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय गफूर शेख, कॉन्स्टेबल भागवत धांडे यांनी सापळा लावला. सावदा ते रावेर रस्त्यावर बिजासनी माता मंदिरजवळ रीक्षा आल्यानंतर तिची तपासणी केली असता
त्यात सात हजार रुपये किंमतीच्या इम्पेरीयल ब्लू कंपनीच्या 54 बाटल्या तसेच एक हजार 500 मॅकडॉल व्हिस्कीच्या 10 बाटल्या आढळल्या. भागवत धांडे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.