भुसावळ– दारूच्या नशेत तापी पात्रावर गेलेल्या एकाचा नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू झाला. संजय धर्मा कोळी (36, सातोद, ता.यावल, ह.मु.पिंप्रीसेकम) असे मयताचे नाव आहे. 4 रोजी दुपारी एक वाजता कोळी हे दारूच्या नशेत तापी नदीवर गेले असता तापी नदीपात्रात बुडाले. या प्रकरणी तालुका पोलिसात भगवान धर्मा कोळी (32, पिंप्रीसेकम) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक प्रेमचंद सपकाळे करीत आहेत.