Drunken Dir molesting sister-in-law : Crime Against Both धरणगाव : दारूच्या नशेत दिराने आपल्या वाहिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यातील एका गावात घडला. या प्रकरणी पीडीत महिलेच्या तक्रारीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गुंड लावण्याची धमकी देत केला विनयभंग
पीडीत महिलेने आपल्या दोघं दिरांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली होती. याचाच राग धरून ८ ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास दारूचा नशेत घरात प्रवेश करीत आमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार का केली?, दिलेली तक्रार मागे घे. नाहीतर तुला सोडनार नाही, अशी धमकी दिली. तसेच पिडीतेला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. एवढेच नव्हे तर, तुझ्या मुलीला गुंड लावून मुंबईला उचलुन घेऊन जाऊ व तुम्हाला समाजात तोंड दाखविण्यास लायक ठेवणार नाही, अशी धमकी दिली. तसेच पीडीता ही १२ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास अंघोळ करीत असतांना दुसरा दीर हा गुपचुप पाहत होता. ही गोष्ट पीडीतेच्या मुलीने बघताच त्याने तेथून पळ काढला. संशयीत आरोपींनी वेळोवेळी आपल्या वहिनीचा वेळोवेळी विनयभंग केल्याने संशयीत जीवनसिंग उर्फ हंसराज रामसिंग प्रजाचितोडीया व लक्ष्मणसिंग रामसिंग प्रजाचितोडीया (धरणगाव तालुका) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार उमेश भालेराव हे करीत आहेत.