दारूच्या नशेत दुचाकीवरून पडल्याने एक जखमी

0

उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल

जळगाव । 25 वर्षीय तरूण दारूच्या नशेत मोटारसायकलने भजे गल्लीतून दुचाकीने जिल्हा रूग्णालयाकडे जात असतांना सुनिल मेडीकल समोरील आश्‍विनी ट्रेडर्स जवळ तीन ठीकाणी डूलक्या देत शेवटी मेडीकल समोर उभ्या असलेल्या सायकलला धडक दिल्याने सायकलच्या मागच्या चाकाचे पुर्णपणे नुकसान झाले असून मोटारसायलक स्वार तरूणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडली असून त्याचा उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शरद उर्फ बारकू भदाणे (वय-36) रा. जूने जळगाव हा दारू पिऊन मोटारसायकल क्र.(एमएच 19 बीएक्स 2388)ने भजे गल्लीतून जात असतांना जिल्हा रूग्णालयामागील सुनिल मेडीकल जवळील आश्‍विनी ट्रेडर्स समोर उभी असलेली सायकलला धडक दिली. त्यात सायकलच्या मागच्या रिंगचे नुकसान झाले असून मोटार सायकलस्वार शरद भदाणे यांच्या तोंडाला व डोक्याला दुखापत झाली.

अनोळखी व्यक्तीची तत्परता
जवळून जाणार्‍या एका अज्ञात व्यक्तीने तत्परता दाखवत त्याला तात्काळ जवळच असलेल्या जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. शरद भदाणे हा घरातील एकुलता एक मुलगा असून त्याला वडील नाही. घरात आई कमवती असल्याची माहिती नातेवाईकांनी जनशक्तिशी बोलतांना सांगितले.