दारूबंदीसाठी ठराव मांडणार : उपमहापौर

0

हडपसर । युवावर्ग दारूच्या आहारी जाऊन आपले सर्वस्व गमावत आहेत, ऐन तारुण्यात महिला विधवा होत आहेत. या गंभीर परिस्थिती वर अंकुश ठेवण्यासाठी महापालिका हद्दीत दारूबंदीचा ठराव मांडणार आहे, अशी माहिती उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महिला आघाडी पुणे शहराध्यक्ष शशिकला वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शिंदेवस्ती शाखाचे उद्घाटन उपमहापौर डॉ. धेंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी महेंद्र कांबळे, महिपाल वाघमारे, नीता आडसुळे, हिमाली कांबळे, लिबोनी वाघमारे, उषा पवार, बेबी घाडगे, आशा सावंत, संतोष खरात, राजू कांबळे, वैशाली शिंदे, यादव हारणे, शांता गवळी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजू कांबळे यांनी केले.