दारूबंदीसाठी पुढाकार : मुक्ताईनगर पोलीस उपअधीक्षकांचा सत्कार

0

वरणगाव- मुक्ताईनगरचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुभाष नेवे व त्यांच्या पथकाने गेल्या काही दिवसांपासून दारूबंदी संदर्भात पावले उचलत विविध ठिकाणी धाडी टाकून दारूअड्डे नष्ट केल्याप्रकरणी निंभोरा व वरणगाव येथील महिलांनी पोलीस उपविभागीय अधिकारी सुभाष नेवे पोलिस कर्मचारी अक्षय हिरोंळेसह पोलिस पथकातील कर्मचार्‍यांचा गौरव केला. गेल्या काही दिवसांपासून सुभाष नेवे यांनी स्वतः वरणगाव व सावदा पोलीस स्टेशन हद्दीत धाडी टाकत गावठी दारूचे अड्डे नष्ट केले. त्यामुळे महिलांचे उद्ध्वस्त होणारे संसार वाचल्याने निंभोरा व वरणगाव येथील महिलांनी मुक्ताईनगर येथील उप विभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन त्यांचा गौरव केला आहे .या प्रसंगी वरणगावच्या माळी समाजाच्या सविता माळी व निंभोरा येथील सोनाली महाजन तसेच अन्य चार ते पाच महिलांची उपस्थिती होती.