निजामपूर । साक्री तालुक्यातील खुडाणे गावात मोठ्या प्रमाणावर हातभट्टीची दारू विक्री होत असल्याने गावातील तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन होत आहे. या अवैध प्रकारावर बंदी घालून कारवाई करण्याची मागणी करत पराग गवळे यांना भेटून आदिवासी महिला, तरुणांनी व ग्रामस्थांना गावात दारु बंदी व्हावी असे ठरविले. यानंतर निजामपूर पोलीस ठाण्यात येऊन पोलीस उपनिरीक्षक कौतीक सुरवाड़े यांना निवेदन देवून त्वरीत दारुबंदी व्हावी व जे बेकायदेशीर विक्री करतात त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे निवेदन देण्यात आले. यावेळी उपसंरपच नामदेव गवळे, मंडाबाई सोनवणे, राम सोनवणे, चैत्राम भिल, बबलु खैरणार, किशोर गवळे, गोरख देवरे, शरद गवळे, पराग माळी गावातील सुमारे 100 ते 150 नागरिक उपस्थित होते.