दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार

0

जळगाव। जळगाव तालुक्यातील नांद्रा बुद्रूक येथील महिलांनी गावात दारुबंदीच्या विरोधात आज नांद्रा ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांनी तात्काळ दुकान बंद करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यासोबतच दोन दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास संपूर्ण महिला ह्या दारू दुकानाची तोडफोड करून सगळे उद्ध्वस्त करतील असा इशाराही महिलांनी दिला. यानंतर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी मी स्वत: दोन दिवसात नांद्रा गावात येवून पाहणी करून निर्णय देईल असे, आश्‍वासन दिले. तसेच महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणुन गेले होते.

दारूबंदीचा ठराव…
मौजे नांद्रा बुद्रुक गावी दारू बंदीच्या विरोधात मतदान प्रक्रिया राबविण्यात आली होती. यावेळी गावातील 74 टक्के महिलांनी दारुबंदीच्या विरोधात मतदान केले होते. तरी देखील तरी गावात दारु विक्री सुरु आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दहीवडे यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेवून देशीदारु दुकान बंद करण्याबाबत ग्रामपंचायतीने ठराव मंजुर केला होता. याबाबत व्हीडीओ सीडी व ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. तरी देखील देशीदारू विक्री सुरु आहे. याबाबत ग्रामपंचायतीमार्फेत तसेच गावातील महिलांनी केलेल्या तक्रारीची कुठलीही दखल न घेण्यात आल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज नांद्रा ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी पदयात्रा काढून देशी दारू विक्रीचे दुकान बंद करण्यात यावे अशी मागणी केली. याबरोबर गावातील 651 महिलांनी दारूबंदीच्या विरोधात मतदान केले. दारूबंदीचा ठराव ग्रामपंचायतमध्ये मंजुर असतांना देखील दारु विक्री सुरु आहे. संपूर्ण गावाला देशी दारू दुकान नको हवे आहे तर मग ते चालू का आहे? देशी दारु दुकान बंदला कोणाचा विरोध नसतांना देखील का बंद करण्यात येत नाही? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे.

अन्यथा दुकानाची तोडफोड करून
मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास दारू बंदी झालीच पाहिजे अशा घोषणा देत नांद्रा येथील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. महिलांनी दिलेल्या जोरदार घोषणांनी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणुन गेले होते. ग्रामस्थ भेटण्यासाठी आलेले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना मिळातच त्यांनी देखील कार्यालयात सुरू असलेली बैठक बाजूल सारून कार्यालयाबाहेर येत महिलांची भेट घेत त्यांच्या अडचणी जाणून घेत निवेदन स्विकारले. यानंतर संतप्त महिलांनी त्यांच्याकडे दारू बंदीचा ठराव असतांना गावात देशी दारू विक्री होत आहे. या देशी दारू विक्री करणार्‍यांवर दोन दिवसात कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांच्याकडे केली. दोन दिवसात कारवाई न झाल्यास दुकानाची तोडफोड करण्यात येईल असा इशार ग्रामस्थांसह महिलांनी दिला. यावेळी दारू बंदीसाठी नांद्रा येथील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. तर गावातील मुले व्यासनी झाले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

कारवाईचे दिले आश्‍वासन
ग्रामस्थांस महिलांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळक यांनी स्वत: दोन दिवसात नांद्रा गावात येवून चौकशी करून कारवाई करेल असे आश्‍वासन दिले. जिल्हाधिकार्‍यांनी कारवाईचे आश्‍वासन दिल्यानंतर महिलांना दिलासा मिळाला. यानंतर मोर्चेकरी ग्रामस्थ गावाकडे परतले. दरम्यान, यावेळी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यांचा होता सहभाग
दारूबंदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात प्रतिभा सपकाळे, दुर्गाबाई सोनवणे, सुभदा सोनवणे, उषाबाई पाटील, शोभाबाई चौधरी, ज्योती मधुकर खैरे, बेबाबाई सोनवणे, सुनिता सोनवणे, कमल सोनवणे, सरला सपकाळे, सरूबाई सोनवणे, अर्चना सोनवणे, उषाबाई सोनवणे, कविता वाघ, दुर्गा सोनवणे, सुभुद्र सोनवणे, कैशल्या सोनवणे, उषा पाटील, शोभाबाई चौधरी, सुनिता सोनवणे, कमल सोनवणे, उज्वला सोनवणे, सरला सपकाळे, अर्चना सोनवणे, आदी महिलांचा सहभाग होता.