दारूमुक्त करण्यासाठी ‘दारूमुक्ती निर्धार’

0

बुलडाणा । दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. यामुळे जिल्हा दारूमुक्त करण्यासाठी हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने दारूमुक्ती निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 15 सप्टेंबरला ही परिषद जिल्ह्यातील गर्दे सभागृहात पार पडणार आहे. या परिषदेस सत्यपाल महाराज, पारोमीता गोस्वामी, अविनाश पाटील या समाजसुधारकांच्या मार्गदर्शन लाभणार आहे. दारूबंदी व्हावी यासाठी या क्षेत्रात काम करणार्‍या हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या संस्थापिका वृषाली बोन्द्रे यांनी या सर्वांना एकत्रित आणून या परिषदेचे आयोजन केले आहे.