दारूला पैसे न दिल्याने आईला मारहाण

पुणे : दारुला पैसे दिले नाही म्हणून आईला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याच बरोबर लहाण भावाच्या छातीत लोखंडी भाला सुद्धा खुपसला. या घटनेत प्रविण लक्ष्मण शिंदे (वय ४०, पापळवाडी चास, खेड ) हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना चास पापळवाडीत घडली आहे. आरोपी सुनिल लक्ष्मण शिंदे (रा. पापळवाडी चास) याला खेड पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी आरोपी सुनिल शिंदे वृद्ध आईकडे दारू पिण्यास पैसे मागत होता. आईने पैसे देण्यास नकार दिल्याने चिडून सुनिल शिंदे यांने आईला शिवीगाळ करून हाता पायावर काठीने मारहाण केली. हा प्रकार भाऊ प्रविण शिंदे याला कळताच आरोपी सुनिल याला, तू आईला का मारहाण केली असा जाब विचारला असता राग मनात धरुन सुनिल याने घरात ठेवलेला साप मारण्याचा लोखंडी भाला आणून प्रविणवर प्रहार केला.