चाळीसगाव (प्रतिनिधी) – दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून शिवीगाळ करून एकाच कानाजवळ चाकू सारख्या धारदार वस्तू ने वार करून जखमी केल्याची घटना 05 डिसेंबर 2016 रोजी रात्री 10:30 ते 11 वाजेच्या दरम्यान रांजणगाव गावातील फिर्यादीच्या घरासमोरील मस्जिद समोर घडली असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमींवर देवरे हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहे. आरोपी भूषण नंदू चव्हाण (रा. रांजणगाव ता. चाळीसगाव) याने हरी उत्तम वारुळे (36, रा. रांजणगाव ता. चाळीसगाव) यांचे कडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते त्यांनी पैसे दिले नाहीत. म्हूणन 05 डिसेंबर 2016 रोजी रात्री 10:30 ते 11 वाजेच्या दरम्यान हरी वारुळे यांचे घरासमोरील मस्जिद जवळ आरोपी भूषण नंदू चव्हाण याने हरी उत्तम वारुळे यांना शिवीगाळ करून त्यांचे कानाजवळ चाकू सारख्या धारदार वस्तूने मारून जखमी केले आहे. त्यांना उपचारासाठी येथील देवरे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपी भूषण नंदू चव्हाण याचे विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला भाग 5 गु.र.न. 124/2016 भा.द.वि. कलम 324, 504, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गणपत महिरे करीत आहे.