दारूसाठी पैसे न दिल्याने डोक्यात घातला दगड

0
पिंपरी चिंचवड : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने दोघांनी एकाच्या डोक्यात दगड घातला तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली. यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी (दि. 13) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास थेरगाव येथे घडली. रवी भिलारे व प्रसाद थोरात (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अमन सुनिल कौशल (वय 19, रा. क्रांतीवीर नगर, थेरगाव यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिलारे आणि थोरात दोघांनी अमन यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मद्य प्राशन करण्यासाठी पैसे देण्यास अमनने नकार दिला. याचा राग मनात धरून दोघांनी मोठा दगड उचलून अमन यांच्या डोक्यात मारला. थोरात याने लाथाबुक्यांनी मारहान केली. शिवीगाळ केली. यात अमन जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.