दारू आणि कोल्ड्रींक घातक; मिश्रण किक बसेल पण मृत्युच्या दारात जाल…

0

दारू आणि कोल्ड्रींक किंवा एनर्जी ड्रींक भलेही छानपैकी किक देत असेल पण सावधान. या मिश्रणाची किक आपल्याला मृत्युच्या दारात घेऊन जाईल, अशी साधार भीती कॅनडातील अभ्यासकांनी व्यक्त केलेली आहे. साधारणपणे दारू पिऊन पिऊन माणूस कंटाळतो आणि कंटाळला की घराची वाट धरतो. पण एनर्जी ड्रींक किंवा कोल्ड्रींक मिक्स केले की माणूस दारू पितच रहातो. त्याला समजत नाही आपण किती पितो ते. या घातक मिश्रणाने मानसिक संतुलनही बिघडते.

कॅनडामधील व्यसनांवर अध्ययन करणार्‍या व्हीक्टोरीया विद्यापीठाच्या एका अभ्यास प्रकल्पात लक्षात आले आहे की अत्याधिक कॅफिनचे प्रमाण असलेली शीत पेय किंवा एनर्जी ड्रींक मद्याबरोबर मिसळून ते मिश्रण प्यायल्याने मृत्युचा धोका वाढू शकतो. जर्नल ऑफ स्टडीज ऑन अल्कोहोल अँड ड्रग्ज या संशोधन पत्रिकेत प्रकाशित एका संशोधन लेखामध्ये यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. कॅफिन असलेले कोल्ड ड्रींक किंवा एनर्जी ड्रींक मद्यात मिसळल्यानंतर नशा वाढते हे खरे आहे. मात्र, ते मृत्युच्या दारात घेऊन जाते. कोल्ड्रींक दारूत ओतून पिण्याचे प्रमाण अमेरिकेत अधिक आहे. रेड बुलला यात अधिक पसंती दिली जाते, असे अभ्यासकांना आढळले आहे. याबाबत अधिक संशोधन करून लोकांना सावध करण्याचे काम हाती घेण्याची गरज विद्यापीठाने बोलून दाखवली आहे. या अभ्यासासाठी जर्नलमध्ये लिहिलेल्या लेखांचे कण्टेण्ट विश्लेषण केले होते. 13 पैकी 10 लेखांमध्ये एनर्जी ड्रींक व दारू यांच्या मिश्रणाचे दुष्परीणाम स्पष्ट केलेले आहेत. नुकसानांचे वर्गीकरणही अभ्यासात केले आहे. भांडणे, शारिरीक हिंसा, वाहनांचे अपघात, जखमी होणे असे प्रसंग दारू अधिक कोल्ड्रींक किंवा एनर्जी ड्रींकने उद्भवतात.