दारू दुकाने सुरु झाल्यास आत्मदहन

0

जळगाव। शहरातील भिकमचंद जैन नगर, गुड्डूराजा नगर, प्रेमनगर, कांचननगर व ढाके कॉलनी या भागात दारु दुकाने सुरू करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्याने त्यांना परवानगी देण्यात येऊ नये, या मागणीसाठी परिसरातील महिलांसह नागरिक 25 मे रोजी गुरुवारी जिल्हाधिकारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आढाव यांच्या दालनात निवेदन करण्यासाठी पोहचले. यावेळी स्थानिक नगरसेवक संदेश भोईटे,दिलीप सोमाणी ,आगीवाल, कानळदेकर,किरण भोळे, मितेश भदाणे,स्वप्नील राजपूत,तोष्णीवाल,नयना पाटील,गोरख वाणी,संजना पाटील,राधिका पाटील आदी परिसरातील पुरुष महिला उपस्थित होते.

मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यासह आत्मदहन करण्याचा इशारा महिलांनी दिला. राष्ट्रीय व राज्य मार्गावरील दारु दुकान बंद झाल्यानंतर परिसरातील दारु व्यावसायिक शहरातील विविध भागात दारु दुकान सुरू करण्यासाठी जागा घेत असून याबाबत जोरदार हालचाली सुरू करण्यात आल्या आहे. अशाच प्रकारे भिकमचंद जैन नगर, गुड्डूराजा नगर, प्रेमनगर, कांचननगर व ढाके कॉलनी या भागातही जागेचा शोध सुरू असल्याने या भागातील रहिवाशांनी दारु दुकानांना विरोध म्हणून थेट जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क अधिकारी आढाव यांचे कार्यालय गाठले.