दारू पिऊन धिंगाणा करणार्‍यास मारहाण

0

जळगाव । शहरातील तुकारामवाडीत राहणार्‍या 61 वर्षीय व्यक्तीने दारू पिऊन धिंगाणा घातल्याप्रकरणी दोघांनी डोक्यात दगड मारून गंभीर दुखापत झाल्याची घटना कंजरवाड्यात घडली. विशेष म्हणजे मारहाण करणार्‍या दोघांनी त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार, रमेश पाराचंद आस्कर (वय-61) रा. तुकाराम वाडी यांनी दारू पिऊन कंजरवाड्यात इतर दोघांशी वाद घातला. दारू पिऊन आल्याने दोघांनी मारहाण केली तर त्यातील एकाने डोक्यात दगड घातला. या दगडाच्या घावाने रमेश आस्कर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून मारणार्‍या दोघांनीच वृद्धाला रिक्षातून जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले.