पिंपरी : एका कार चालकाने दारू पिऊन कार चालवली. तसेच त्या कारने सिग्नलवर थांबलेल्या रिक्षाला आणि रिक्षाने पुढील कारला धडक दिली. यावरून मद्यपी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी रात्री अहिल्याबाई होळकर चौकात घडली. अभिजित अशोकराव महादर (वय 45, रा. पिंपरी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पंकज गंगाधर वाघमारे (वय 36, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित यांच्याकडे मारुती बलेनो ही कार आहे. ते रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पिंपरीमधील अहिल्याबाई होळकर चौकात सिग्नलला थांबले होते. त्यावेळी त्यांच्या मागे उभी असलेली रिक्षा त्यांच्या कारला धडकली. रिक्षा कारला धडकण्याचे कारण बघण्यासाठी अभिजित कारमधून खाली उतरले. त्या रिक्षाच्या मागे एक स्कॉर्पिओ कार उभी असून त्या स्कॉर्पिओ कारने रिक्षाला आणि रिक्षाने अभिजित यांच्या कारला धडक दिल्याचे दिसले. स्कॉर्पिओ कारवरील चालक पंकज हा दारू पिऊन कार चालवत असल्याचे लक्षात येताच अभिजित यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत