भुसावळ : दारू पिण्यासाठी पैसे मागितल्याने ते न दिल्याचा राग आल्याने दोघांनी डोक्यात वीट मारून दुखापत केल्याची घटना शहरातील शिवाजी नगराजवळील सोमवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोघांविरोधात बुधवारी रात्री उशिरा भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा
याबाबत रहिम कालू गवळी (27, शिवाजी नगर, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास ते कामावरून घरी परतत असताना शिवाजी नगराजवळील खानसाहेब यांच्या देशी दारू दुकानाजवळ संशयीत आरोपींनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले मात्र गवळी यांनी ते देण्यास नकार दिल्याने आरोपी रईस रफिकने डोक्यात वीट मारून दुखापत केली. या प्रकरणी संशयीत आरोपी रईस रफिक शेख उर्फ चिकना (मटण मार्केट, भुसावळ) व नासीरखान बशीरखान उर्फ मच्छर (मच्छि मोहल्ला, भुसावळ) यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक तेजस पारीसकर करीत आहेत.