जळगाव। गुजराल पेट्रोलपंपाजवळ चायनीज खाद्यपदार्थ विक्रीच्या गाडीमध्ये देशी दारू ठेवून विक्री करणार्यावर जिल्हा पेठ पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. त्याला रविवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एच. खेडकर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली.
गुजराल पेट्रोलपंपाजवळ एका चायनीजच्या गाडीवर अवैधरीत्या देशीदारूची विक्री करणार्या रामकृष्ण संतोष पाटील याला अटक केली होती. त्याच्याकडून दोन हजार रुपये किमतीच्या 36 दारुच्या बाटल्या ताब्यात घेण्यात आल्या. त्याला न्यायाधीश खेडकर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी मंजूर केली. त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला. सरकारतर्फे अॅड. अनिल गायकवाड यांनी कामकाज पाहिले.