शहादा । शहादा वन विभागाच्या वतीने लोकसहभागातून प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून वृक्ष लागवड करता कै.विश्रामकाका पाटील शैक्षणिक संकुल आवारातून वृक्ष दिंडी व रँलीचे आयोजन करण्यात आले.रँलीचे उदघाटन आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले.शेठ व्ही.के.शहा विद्या.मंदिरच्या प्रांगणातून निघालेल्या वृक्ष रँलीचे अध्यक्ष मुख्य वनसंरक्षक राजेंद्र कदम होते.तर रँलीला डॉ.विजयकुमार गावित यांनी हिरवी झेंडी दाखवली आहे.महाराष्ट्र राज्य वनविभाग व इतर विभागाच्या मार्फत 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान 10लाख 50 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचा लोकसहभाग प्रचार-प्रसाराच्या माध्यमातून वन-वन्यजीव संवर्धन व संरक्षण प्रभावीपणे करण्याकरीता या वृक्ष दिंडी व रँलीचे आयोजन झाले.
वृक्ष दिंडी व रॅली
यावेळी वनश्री तथा नगराध्यक्ष मोतीलाल पाटील ,प.स.सभापती दरबारसिंह पवार, तहसिलदार मनोज खैरनार, वृक्ष प्रेमी हैदर नुरानी, मुख्य वनसंरक्षक राजेंद्र कदम, उपवनसंरक्षक नंदुरबार पियुषा जगताप, विभागीय वनाधिकारी सुरेश मोरे जि.प.सदस्य अभिजित पाटील, नगरसेवक संदिप चौधरी, राष्र्टवादिचे अनिल भामरे,कांतीलाल टाटीया, एस.आर.चौधरी, अनिल पवार,फुलपगारे, दिनेश खंडेलवाल, भाजपा ता.अध्यक्ष डॉ.किशोर पाटील प्राचार्य छोटुलाल चौधरी व विविध शाळेचे पदाधिकारी ,शिक्षक, विद्यार्थी होते.