दिंडीत सहभागी वृद्धाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

0

निजामपुर । 4 जुलै रोजी आषाढी एकादशी असून एकादशी निमित्त पंढरपूरची यात्रा आहे. यात्रेला राज्यभरातुन भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या जैताणे येथील वारकरी बापु लकड़ु माळी वय 65 हे पायी दिंड़ीत सहभागी झाले होते. दिंडीत विठ्ठल नामाचा जयघोष करीत पंढरपूरला जात असतांना मनमाड डोनगाव जवळ त्यांना हृदय विकाराचा झटका आला त्यातच त्यांचा मृत्यु झाला. हृदय विकाराचा झटका आल्याने ते जमिनीवर पडले. त्यांच्या सोबत असलेल्या वारकरी मंडळींनी मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैघकीय अधिकारी यांनी तपासणी केली नंतर मूत घोषीत केले. ही घटना शनिवारी 17 रोजी घडली. जैताणे गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. घटनेने जैताणे निजामपुर गावात शोककळा पसरली आहे. जैताणे गावाचे बापु माळी हे गेल्या अनेक वर्षापासुन अखंड पायी दिंडीत सहभाग होऊन पंढरपुरला जात असे. मयत बापु लकड़ु माळी यांच्या पश्‍चात तीन मुले, दोन मुली, पत्नी असा परिवार आहे. भाजीपाला विकी ते गुजरान करत होते.