180 वर्षांची अखंड परंपरा ; रथावर रेवड्यांची उधळण
रावेर : सुमारे 180 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या दत्त जयंती रथोत्सवास दिगंबरा, दिगंबराच्या जयघोषात सुरुवात करण्यात आली. प्रारंभी दत्त मंदिराचे गादीपती श्रीपाद महाराज यांनी सपत्नीक रथाची पूजा केल्यानंतर रथ नगर परीक्रमेला सुरुवात झाली. भाविकांनी रथावर रेवड्यांची उधळण केली तर रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी दर्शनार्थ गर्दी केल्याने रावेर शहरात भक्तीचा मळा फुलल्याचे चित्र दिसून आले. राज्या-पर-राज्यातील भाविकांची प्रसंगी उपस्थिती होती.