दिग्दर्शकांनी वेडा ठरवलं

0

मुंबई । दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी शूटींग दरम्यानचा एक जुना फोटो ट्विटरवरून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला. 1977 मध्ये रिलीज झालेल्या ’खून पसीना’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचा अमिताभ बच्चन यांचा हा फोटो आहे. शेअर केेलेला हा फोटो पाहून मला स्टंट दिग्दर्शकांनी वेडा ठरवलं, असे अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून सांगितले.

वाघाशी दोन हात
फोटो ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट असून यामध्ये अमिताभ बच्चन एका खर्‍या वाघासोबत दिसत आहेत. चित्रपटाचील एक सीनमध्ये अमिताभ बच्चन वाघाशी दोन हात करत असतात, त्यावेळी सेटवर एका खर्‍या वाघाला आणण्यात आले होते. अमिताभ बच्चन यांनी स्वत: हा धाडसी सीन शूट केला होता. मात्र, त्यांचा हा फोटो पाहून स्टंट दिग्दर्शकांनी त्यांना वेडा म्हटले आहे. स्वत: अमिताभ बच्चन यांनीच ही माहिती दिली आहे.

खर्‍या वाघासोबत सीन शूट करणे आव्हान होते
चित्रपटातील भूमिका खरीखुरी वाटावी यासाठी चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी खर्‍या वाघासोबत लढाईचा स्टंट केला. परंतु सध्याच्या दिग्दर्शकाला हा स्टंट वेडापणाचा वाटतोय, असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले आहे. अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन वाघासोबत दोन हात करताना दिसत आहेत. या फोटोसोबत अमिताभ यांनी कॅप्शन लिहिली आहे की, ’खून पसीना चित्रपटाक एका खर्‍या वाघासोबत लढत होतो, एक खरं आव्हान होतं ते….आजच्या जमान्यातील स्टंट दिग्दर्शकांसोबत मी हे शेअर केलं….त्यांना वाटलं मी वेडा होतो’.