भोपाळ-आज मध्यप्रदेश सरकारचा मंत्रिमंडळ शपथविधी सोहळा पार पडला. २८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात सहभाग आहे. दरम्यान कॉंग्रेस नेते माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचे पुत्र जयवर्धन सिंह यांना मंत्रीपद देण्यात आले असून त्यांनी आज शपथ घेतली आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी त्यांना शपथ दिली.
मध्यप्रदेशमध्ये कॉंग्रेस सरकार गेल्या १५ वर्षानंतर आली असून मुख्यमंत्रीपदी कमलनाथ विराजमान झाले आहे. दिग्विजय सिंह हे मध्यप्रदेशमधील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आहे.