दिघावेत शेतीच्या बांधावरून झालेल्या वादात 11 जखमी

0

साक्री । तालुक्यातील दिघावे गावात शेतीच्या बांधावरून वाद निर्माण होवून मारहाण झाली. त्यात 11 जण जखमी झाले आहेत. जखमीेंवर साक्री ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले. तर दोन जण गंभीर दुखापत झाल्याने जिल्हा रूग्णालय धुळे येथे हलविण्यात आले आहे. यात पंडीत नामदेव शेवाळे (वय 65), योगेश पंडीत शेवाळे (वय 30), राजेंद्र सूर्यवंशी (वय 40), निलेश पंडीत शेवाळे (वय 25), स्मृती योगेश शेवाळे (वय 19), भारती निलेश शेवाळे (वय 29), वकील नामदेव शेवाळे (वय 45), बालू वकील शेवाळे (वय 20), शंकर वकील शेवाळे (वय 18), कलाबाई वकील शेवाळे (वय 45) हे जखमी झाले आहेत. याबाबत साक्री पोलिसात गुन्हा नोंदविण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. योगेश शेवाळे व वकील शेवाळे यांच्या शेताचा बांध एकच असल्याने हा वाद झाला.