साक्री । साक्री तालुक्यातील दिघावे येथे दशपुते परिवाराचा स्नेहमिलन मेळावा 28 मे रविवार रोजी न्यु इंग्लिश स्कुलच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. गेल्या पन्नास वर्षापासून व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने दिधावे गाव सोडून इतरत्र गेलेल्या दशपुते परिवाराचा मेळावा दिघावे येथे होत आहे. मेळावा सकाळी 10 वाजता प्रारंभ होईल. यावेळी स्वागत गीत, प्रास्ताविक, ज्येष्ठांच्या हस्ते उद्घाटन, तद्न्ंतर परिचय व कलागुण सादर होतील. त्यानंतर समाज प्रबोधन होणार आहे. तर सायंकाळी 4 वा. मेळाव्याचा समारोप होणार आहे. यावेळी दशपुते परिवाराचे श्रद्धास्थान असलेल्या गावातील माऊली मंदिरावर उपस्थित दशपुते परिवार एकत्रीतपणे भेट देणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन सेवानिवृत्त मुख्याध्यापक व पिंपळनेर लाडशाखीय वाणी समाज मंडळाचे सचिव ए.पी.दशपुते व सुरेश दशपुते (नाशिक) यांनी केले आहे.