सार्क्री । साक्री तालुक्यातील दिघावे येथील ग्रामदैवत श्री चिंतामणी देवाच्या यात्रोत्सवास सालाबादाप्रमाणे आज 25 एप्रिल पासुन प्रारंभ होत आहे. याप्रसंगी भाविकांनी अधिक संख्येने उपस्थिती देवून लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. दरम्यान दोन दिवस चालणार्या यात्रोस्तवात विविध ठिकाहून व्यावसायीक आपले व्यवसाय घेवून आपली दुकाने थाटली आहेत. तसेच भाविकांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशाचे आयोजन यात्राउत्सव समितीच्यावतीने करण्यात आली आहे.
चिंतामण देवाची आख्याईका अशी आहे की पूर्वी पांडव वनवासात फिरत असतांना ते दिघावे शिवारातील जंगलातून जात असतांना गावाजवळ हिंदळ बारीत हिंडब व हिंडिबा नावाचे राक्षस लोकांना खूप त्रास देत असायचे पांडवांना हिंदळबारीमार्गे पुढील मार्ग अग्रक्रम करायचा होता. पंरतु हिंडीब व हिंडीबा राक्षसांचा सामना कसा करायचा अशी चिंता पांडवाच्या मनात आली म्हणून पांडवांनी दिघावे शिवारात चिंतामणी देवाची स्थापना करून हिंडीब व हिंडीबा राक्षसांशी सामना करण्याचे बळ मागितले.
पांडव हिंदबारी मार्गे जाऊ लागले, तेव्हा राक्षसांनी पांडवांचा रस्ता अडवला तेव्हा हिंडीब व व भिम या दोंघामध्ये मोठे युद्ध झाले. आणि हिंडीब राक्षसाला मारून पराभूत केले. त्यांनतर हिंडीब राक्षसाची बहिण हिंडीबा ही एकटीच राहणार म्हणून तीला पांडवांनी सोबत नेले होते. व भिम व हिंडीबाचा विवाह करण्यात आला होता. त्यामुळे या दिघावे गावातील व परिसरातील लोक चिंतामणी देवाची यात्रा भरतात. या यात्रेत सर्व जातीधर्माचे लोक स्वखुशीने सामील होत असतात. यात्रेसाठी उत्सव समीतीचे अध्यक्ष शांताराम पवार,उपाध्यक्ष शरद अहिरे, साहेबराव भदाणे,बारसू टकले, पोपट टकले,जितेंद्र पानपाटील,देवीदास पवार,सुरेश सोनवणे आदिं परिश्रम घेत आहेत.