दिघा कार्यक्षेत्रात स्वच्छता मोहीम

0

नवी मुंबई :- दिघा विभाग कार्यक्षेत्रात ईश्वरनगर रेल्वे मार्गालगत, विष्णु नगर व पंढरी नगर, बिंदु माधव नगर परिसरामध्ये कचरा वर्गीकरण व कचरा प्रक्रिया करणे याबाबत कम्युनिटी ट्रीजरींगचे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे परिसरातील नागरीकांच्या सहभागाने विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या वेळी दिघा विभागातील सहाय्यक आयुक्त प्रकाश वाघमारे, स्वच्छता अधिकारी सुधाकर वडजे, स्वच्छता निरिक्षक, स्वच्छाग्रही व स्थानिक रहिवाशी मोठयासंख्येने सहभागी झाले होते.

कचरा कुंड्यांचे वाटप
नेरुळ विभाग कार्यक्षेत्रात शिरवणे दत्तवाडी चाळींमध्ये हिंन्दुस्थान पेट्रोलियम प्रा. लि. कंपनीच्या मार्फत ओल्या कचर्‍यासाठी हिरव्या रंगाच्या कचरा कुंड्या व सुक्या कचर्‍यासाठी निळ्या रंगाच्या कचरा कुंड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरात कचरा वर्गीकरण व कचरा प्रक्रिया करणे याबाबत कम्युनिटी ट्रीजरींगचे चे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे नागरीकांना आपले घर व परिसरात निर्माण होणारा कचरा त्याच ठिकाणी वर्गिकरण करण्याकरिता ओला कचरा हिरव्या कचरा कुंडीत व सुका कचरा निळ्या कचरा कुंडीत टाकणेबाबत आवाहन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या वेळी सभागृह नेता जयवंत सुतार, नेरुळ विभाग अधिकारी तथा मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे, स्वच्छता निरिक्षक जयेश पाटील,स्वच्छाग्रही व स्थानिक रहिवाशी मोठयासंख्येने सहभागी झाले होते.