ऐरोली : जय बजरंग सेवा संस्था कावरिया संघ यांच्या वतीने कळवा ते सानपाडा कावड पदयात्रेचे आयोजन केले होते, या कावड पदयात्रेची सुरुवात ही कळवा भास्कर नगर हिंदी हायस्कुल अधून ईश्वरनगर मार्गे एमआयडीसी रोडने सानपाडा भृष्णेश्वर मंदिर या ठिकाणी काढण्यात आली होती, या पदयात्रेचे यंदाचे हे दुसरे वर्ष असून प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही या पदयात्रेत अनेक उत्तरभारतीय नागरिकांनी कावड पदयात्रेत सहभाग घेतला.
पूर्वी ही कावरिया पदयात्रा केवळ उत्तर भारतात साजरी केली जात होती, परंतु श्रावण महिण्याचा महिना हा पवित्र मानला जात असून भगवान शिव शंकराच्या पिंडीला जलाभिषेक घालण्याच्या उद्देशाने कावड पदयात्रा काढली जात असून नागरिक देखिल मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन सानपाडा येथील शिव मंदिरात कावडीतील पाण्याचा जलाभिषेक शंकराच्या पिंडीवर करतात अशी माहिती उत्तर भारतीय सेलचे चे अध्यक्ष विरेश सिंग यांनी दिली. तसेच जय बजरंग सेवा संघाचे अध्यक्ष सुनील विश्वकर्मा यांनी सांगितले – श्रावण महिना हा हिंदू धर्मातील लोक पवित्र मानतात , या महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चा केली जाते, यामध्ये भगवान शंकराला कावडमधून जलाभिषेक घालण्याची प्रथा प्रचलित असून ती उत्तर भारतात मोठ्या संख्येने साजरी करतात, हीच प्रथा महाराष्ट्रासह नवी मुंबई शहरात देखील प्रचलित असून यामध्ये सर्व नागरिक मोठ्या संख्येने सहभाग घेतात .अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी राष्ट्रीय हिंदुसेना अध्यक्ष पी के सिंग, उपाध्यक्ष इंद्रजीत प्रजापती, दुर्गेश पांडे, प्रवीण मिश्रा, राजकुमार यादव, अच्छेलाल यादव, इंद्रराज गुप्ता , यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.